27 September 2020

News Flash

औरंगाबादेत चोख बंदोबस्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी मंदिरांमधून आरत्या करण्यात आल्या. पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते व

| November 16, 2012 05:03 am

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी मंदिरांमधून आरत्या करण्यात आल्या. पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून, शहरात पुरेशी दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
खासदार चंद्रकांत खैरे व त्यांची पत्नी वैजयंती, तसेच महापौर कला ओझा, आमदार किशनचंद तनवानी, प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मुंबईला रवाना झाले. शहरात मोक्याच्या व काही विशिष्ट ठिकाणी राखीव दलाच्या पोलिसांसह चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राखीव दलाची एक तुकडी शहरात तैनात केली असून, योग्य ती दक्षता घेतली जात असल्याचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले. पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, पोलिसांना त्वरेने कामावर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. शहरात सर्वत्र शांतता असून, कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2012 5:03 am

Web Title: tite security in aurangabad
टॅग Maharashtra
Next Stories
1 आयुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धेत टिळक महाविद्यालय प्रथम
2 शतकोटी वृक्षलागवडीचा हिंगोली जिल्हय़ात बोजवारा
3 संगणक युगातही ‘रोजमेळ’ नि ‘वहीखाते’!
Just Now!
X