संत्रा मार्केट येथील रामझुल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तेथील वाहतूक बंद राहील, असे वाहतूक शाखेने म्हटले आहे.
मेयो हॉस्पिटलकडून संत्रा मार्केट रेल्वे उड्डाणपुलावरून जयस्तंभकडे जाणारे तसेच कॉटन मार्केटकडून गार्डलाईनकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. सेंट्रल अॅव्हेन्यूने जयस्तंभकडे जाणारी सर्व वाहने टेलिफोन एक्सचेंज चौकातून डावे वळण घेऊन गंगाबाई घाट चौक, जगनाडे चौक, ग्रेट नागरोड मार्गे धंतोली अंडरब्रीज, पंचशिल चौक मार्गे जातील. बर्डी ते शांतीनगर मार्गे कामठीकडे इतवारी दहीबाजार पुलावरून जाणाऱ्या स्टार बसेस, खासगी बसेस व अन्य जड वाहने पंचशील चौक, धंतोली अंडर ब्रिज, ग्रेट नागरोड, जगनाडे चौक, गंगाबाई घाट, टेलिफोन एक्सचेंज चौकातून उजवे वळण घेऊन कामठीकडे जातील.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
रामझुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीस बंदी
संत्रा मार्केट येथील रामझुल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तेथील वाहतूक बंद राहील, असे वाहतूक शाखेने म्हटले आहे.
First published on: 06-11-2013 at 08:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic struck while ramzula construction in nagpur