05 July 2020

News Flash

औरंगाबादमध्ये गॅरेजमधील स्फोटात दोन ठार, तीन जखमी

भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणा-या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसात वाजता

| February 3, 2014 03:20 am

 भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणा-या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला. तो इतका शक्तिशाली होता की, गॅरेजचे पत्रे उडाले. सात जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांपैकी एक जण तीन वर्षांचा, तर एक तीस वर्षांचा आहे. त्यांची ओळख पटलेली नाही. हा स्फोट गॅरेजमधील गॅस सिलिंडरमध्ये झाल्याचे समजते. स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही. जखमींची ओळख पटली असून त्यांची नावे पुढील प्रमाणे- वाजीद खान, शेख युसूफ अहमद, महंमद अकबर, विजू रमण, विकास रमण पवार, महंमद फारूख, शिराज महंमद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2014 3:20 am

Web Title: two killed three injured in blast in garage at aurangabad
टॅग Aurangabad,Killed
Next Stories
1 साखर उद्योग ‘ऑक्सिजन’वर!
2 चितळे समितीच्या अहवालानंतर सिंचन घोटाळ्याचा दुसरा अंक सुरू करू – पांढरे
3 दर्जेदार आणि सकस साहित्याचा केंद्रबिंदू खेडेच – इंद्रजित भालेराव
Just Now!
X