वडझिरे येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अवधूत परंडवाल व सुदर्शन आवारी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने आमदार विजय औटी यांनी आज प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
गेल्या गुरुवारी वडझिरे येथील पाडळी नदीला आलेल्या पुरात अवधूत परंडवाल, सुदर्शन आवारी यांच्यासह बालू मुरुगन हे तामिळनाडूतील तरुण वाहून गेले. त्या तिघांचाही मृत्यू झाला. राज्य सरकारच्या वतीने परंडवाल व आवारी यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी औटी यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार दोघांच्याही कुटुंबीयांना मंगळवारी मदतीचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून आणखी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे औटी यांनी सांगितले. धनादेश प्रदान करताना प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार जयसिंग वळवी, उद्योजक रामदास भोसले हे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2013 रोजी प्रकाशित
वडझिरे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एकेक लाखांची मदत
वडझिरे येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अवधूत परंडवाल व सुदर्शन आवारी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने आमदार विजय औटी यांनी आज प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
First published on: 12-06-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh help to family of dead in vadzire mishap by state govt