उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे आयोजित आढावा बैठकीत तलावातील गाळ काढण्यासाठी सरकारमार्फत इंधनपुरवठा करण्यास ११ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखडय़ाबाबतची माहिती या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सरकारने ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हय़ास १ अब्ज १६ कोटी ५६ लाखांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. जिल्हय़ातील बंधारे व तलाव या वर्षी कोरडे पडले असून त्यातील गाळ काढण्यासाठी सरकारमार्फत इंधनपुरवठा करण्यात येणार आहे. या कामासाठी अतिरिक्त निधी म्हणून या बैठकीत ११ कोटी ४४ लाखांची तरतूद करण्यात आली.