डाकले महाविद्यालयातील प्राध्यापक बाळासाहेब गणपत तुपे (वय ४०) यांना संतलूक रूग्णालयाजवळ तिघा तरूणांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्तारोको आंदोलन केले. पोलिसांनी अवघ्या सहा तासात मारहाण करणाऱ्यांचा शोध लावला. दोघांना अटक करण्यात आली असून अद्याप एक जण फरार आहे.
गोंधवणी येथील बाळासाहेब तुपे हे डाकले महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आज सकाळी साडे आठ वाजता ते महाविद्यालयाकडे दुचाकीवर निघाले असता त्यांना संतलूक रूग्णालयाजवळ तिघांनी अडविले. त्यांना लाल रंगाच्या पल्सरवर आलेल्या तरूणांनी बॅटने मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेले तुपे जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते. शेजारी असलेल्या हॉटेलचे चालक सुरेश ठुबे, सुभाष त्रिभूवन, रियाज पठाण, बेन्जामन भोसले, प्रवीण लोंढे, संकेत संचेती, रवी गरेला आदींनी त्यांना सोडविले.
तुपे यांना मारहाण झाल्याचे समजताच महाविद्यालयीन विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी संतलूक रूग्णालयाजवळ येऊन रास्तारोको आंदोलन केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांना माहिती मिळताच त्या घटनास्थळी आल्या. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना पकडले जाईल, गुन्हेगारांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. आंदोलकांना उपप्राचार्य बी. आर. आदिक यांनी महाविद्यालयात नेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
प्रमोद दिगंबर दांडगे (वय २१, रा. आंबेडकर वसाहत), तन्वीर अब्दुल रफिक शहा (वय २९, रा. गोंधवणी) यांना ताब्यात घेतले तर रणजीत प्रल्हाद सुरडकर (वय २३) याचा शोध पोलीस घेत आहेत. ते खबडी परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी निघाले होते. त्यांच्या दुचाकीला प्रा. तुपे यांचा धक्का लागला, म्हणून मारहाण केल्याचे दोघांनी सांगितले आहे. तुपे यांना बॅटने बेदम मारहाण केल्याने त्यांच्या पायास जबर दुखापत झाली आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक साळुंके-ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर, पोलिस उपनिरीक्षक भारत बलैय्या, हवालदार टी. जे. आदमाने, पोलिस नाईक विजय वेठेकर, पोलीस कर्मचारी राहुल िशदे, विनोद बोरगे आदींनी तपास कन दोघांना पकडले. मारहाण करणाऱ्यांना तुपे ओळखत नव्हते. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होते. पण पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने गुन्ह्याचा तपास लावला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
प्राध्यापकाला मारहाणप्रकरणी दोघे अटकेत
डाकले महाविद्यालयातील प्राध्यापक बाळासाहेब गणपत तुपे (वय ४०) यांना संतलूक रूग्णालयाजवळ तिघा तरूणांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्तारोको आंदोलन केले. पोलिसांनी अवघ्या सहा तासात मारहाण करणाऱ्यांचा शोध लावला. दोघांना अटक करण्यात आली असून अद्याप एक जण फरार आहे.
First published on: 05-04-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 arrested in beating case of professor