शहरातील तिघा फरार गुन्हेगारांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गुन्हे करून फरार झालेल्या या आरोपींचे शहरात वास्तव्य खुलेआम होते.
सलमान शकील आदमाने, जुल्फोद्दीन मुलानी व वासुदेव अवचर यांना अटक करण्यात आली आहे. बीड येथे गावठी पिस्तुलातून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात आदमाने हा आरोपी आहे. त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. तर मुलानी व अवचर यांच्याविरुद्ध नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो वर्षांपासून फरार होता.
नाशिक, औरंगाबाद तसेच राज्याच्या अनेक भागांत गुन्हे केलेले फरार आरोपी शहरात राहतात. आता अशा गुन्हेगारांना पकडून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी फरार गुन्हेगार पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
५० हजारांना गंडा
शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून पंडित विश्राम दाभाडे या ग्राहकाचे ५० हजार रुपये भामटय़ाने लुटले. दाभाडे हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे भामटय़ांनी गर्दी करुन लोटालोटी केली. दाभाडे यांच्या हातातील एटीएम कार्ड घेऊन त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले. नंतर दाभाडे यांच्या खात्यातून ५० हजार रुपयांची रक्कम काढून भामटय़ाने पोबारा केला. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
तिघा फरारी गुन्हेगारांना अटक
शहरातील तिघा फरार गुन्हेगारांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गुन्हे करून फरार झालेल्या या आरोपींचे शहरात वास्तव्य खुलेआम होते. सलमान शकील आदमाने, जुल्फोद्दीन मुलानी व वासुदेव अवचर यांना अटक करण्यात आली आहे.

First published on: 26-09-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 fugitive accused arrested