औरंगाबाद महावितरण परिमंडलाच्या विविध विकासकामांसाठी ३१० कोटी ७८ लाख रुपयांच्या आराखडय़ास मंजुरी मिळाली. नवीन २४ उपकेंद्रे, २७७० रोहित्रे तसेच १ हजार ६५१ किलोमीटर उच्चदाब वाहिनी व २ हजार ५२ किलोमीटर लघुदाब वाहिनीचे काम यातून होणार आहे. औरंगाबाद ग्रामीण, जालना जिल्ह्य़ातील घरगुती व्यापारी, औद्योगिक व पाणीपुरवठय़ाच्या ४४ हजार वीजग्राहकांना नवीन वीजजोडण्या यामुळे देता येणार आहेत.
महावितरणच्या ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. औरंगाबाद ग्रामीण व जालना जिल्ह्य़ात ३१० कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत. औरंगाबाद विभागात ३३ केव्हीची १० नवीन उपकेंद्रे, कन्नडमध्ये ५ उपकेंद्रे, जालन्यामध्ये ५ उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. परिमंडलात ४ किलोमीटर भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2013 रोजी प्रकाशित
महावितरणच्या ३१० कोटींच्या आराखडय़ास मंजुरी
औरंगाबाद महावितरण परिमंडलाच्या विविध विकासकामांसाठी ३१० कोटी ७८ लाख रुपयांच्या आराखडय़ास मंजुरी मिळाली.
First published on: 18-01-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 310 caror project sanction of mahavitaran