पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी यंदा रेल्वेने एक लाख १७ हजार वारकऱ्यांनी प्रवास करीत रेल्वे प्रशासनाला ८६ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले. यात्रेच्या काळात रेल्वेने विशेष गाडय़ांची सोय केली होती. त्यास वारकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यात्रा कालावधीत म्हणजे १४ ते २३ जुलैपर्यंत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाडय़ांच्या ७३ फेऱ्या केल्या होत्या. यात मिरज, दौंड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी भागांसाठी चालविण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाडय़ांतून एक लाख १७ हजार ९७९ वारकऱ्यांनी प्रवास केला. गतवर्षांच्या तुलनेने यंदा वारकरी प्रवाशांची वाढ दिसून आली. गतवर्षी रेल्वेला ६१ लाख ७६ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
पंढरपूरच्या आषाढी यात्रेत रेल्वेला ८६ लाखांचे उत्पन्न
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी यंदा रेल्वेने एक लाख १७ हजार वारकऱ्यांनी प्रवास करीत रेल्वे प्रशासनाला ८६ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले. यात्रेच्या काळात रेल्वेने विशेष गाडय़ांची सोय केली होती.
First published on: 26-07-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 86 lakh income to railway in pandharpur ashadhi vari