नगर क्लबने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेच्या खुल्या दुहेरी गटात अमरावतीने विजेतेपदासह कांकरिया चषक पटकावला. बारामती व औरंगाबादचे संघ उपविजेता ठरले.
राज्यातील १६३ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. खुल्या गटातील विजेत्या अमरावती संघात जिमी व जिमीत यांचा समावेश होता. ४५ वर्षांवरील गटात अजय नांदुर्डीकर व भावसार (येवला) हे विजेते व नगरचे प्रविण कटारिया-सुनिल माळवदे हे उपविजेते ठरले. ज्येष्ठ नागरिक गटात (५५ वर्षांवरील) डॉ. यादव (येवला) व नगरकर (नगर) यांनी विजेतेपद जिंकले. डॉ. देवदत्त केतकर व पप्पू सोनी (दोघेही नगर) हे उपविजेते ठरले. स्पर्धेत राजेश दवे, विकास पुसद, अशोक मुराई, संजय गुगळे (कोल्हापूर), प्रसन्न उखळकर, शाश्वत शुक्ल (नगर), सोनीत देशपांडे, हर्षां संत (नगर), डॉ. मोहन थोलार, डॉ. पांडुरंग डौले (नगर), विजय कोठारी (नगर), आदींनी
विविध पारितोषिके जिंकली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्लबचे उपाध्यक्ष अशोक पितळे, डॉ. श्री. व सौ. कांकरिया, डॉ. वर्धमान कांकारिया, सागर बक्षी, यांच्या हस्ते झाले.