खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार विलास बडे यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. वैदू जात पंचायतीच्या लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप बडे यांनी केला. त्यांच्यावर अंधेरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जोगेश्वरी येथे वैदू जात पंचायतीमध्ये एका तरुणीला शिक्षा सुनावली जाणार होती. त्याची माहिती मिळताच विलास बडे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना घेऊन मेघवाडी येथे जात पंचायत सुरू असलेल्या सभागृहात गेले. तेथील आक्रमक जमाव पाहून दोन्ही पोलीस कर्मचारी अतिरिक्त पोलीस कुमक घेण्यासाठी गेले.
त्या दरम्यान ३० ते ४० जणांच्या जमावाने आपल्यालो मारहाण केल्याचा आरोप विलास बडे यांनी केला. अध्र्या तासाने पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यानंतर बडे यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
पत्रकार विलास बडे यांच्यावर हल्ला
खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार विलास बडे यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. वैदू जात पंचायतीच्या
First published on: 03-10-2013 at 06:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on journalist vilas bade