मलेशिया येथील क्वाललांपूर येथे होणाऱ्या जागतिक बाजारपेठ परिषदेच्या निमित्ताने दिला जाणारा ‘शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना जाहीर झाला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ही परिषद मलेशियातील पुत्रराज्य इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. जागतिक बाजारपेठ परिषदेचे डॉ. आर. एल. भाटिया यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळवले आहे.
मार्केटिंग क्षेत्रातील प्रा. फिलिप कोटलर व डॉ. मार्कलिन लिमेरी हे पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.