राज्यातील यंत्रमागांच्या वीजदरात अवाजवी व भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या निषेर्धात कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनतर्फे इचलकरंजी येथील शिवाजी पुतळा येथे एकत्र जमून मोर्चाने मलाबादे चौकात आज आमदार सुरेश हाळवणकर व वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. शासनाने ही वीज दरवाढ मागे घेतली नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यंत्रमाग व्यवसायास कामगारांची टंचाई, सुताची भाववाढ, कमी झालेली मजुरी अशा अनेक समस्या भेडसावत असतानाच महावितरण कंपनीने दि. ११ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाद्वारे पूर्वीची वीजसवलत बंद केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे यंत्रमागांचे वीज दर देशात सर्वोच्च ठरले आहेत. या वीजदर वाढीविरोधात यंत्रमाग उद्योजकांचा मेळावा नुकताच पार पडला होता. त्या वेळी हे आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार आज सर्व यंत्रमागधारक शिवाजी पुतळा येथे जमले व मोर्चाने मलाबादे चौक येथे आले. या वेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी बोलताना आमदार हाळवणकर म्हणाले, देशातील इतर राज्यांनी उद्योग वाढीसाठी वीज दरात सवलत दिली आहे. पण महाराष्ट्र सरकारने हा उद्योग मोडीत काढण्याच्या दृष्टीनेच पावले उचलली आहेत.
या वेळी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक
राशिनकर यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके, नगरसेवक मदन झोरे, पांडुरंग म्हातुकडे, तमन्ना कोटगी, धोंडीराम जावळे, पांडुरंग धोंडपुडे, रावसाहेब तांबे (रेंदाळ) आदींसह मोर्चात मोठय़ा संख्येने यंत्रमागधारक उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
वीजदर वाढीच्या निषेधार्थ इचलकरंजीत बिलांची होळी
राज्यातील यंत्रमागांच्या वीजदरात अवाजवी व भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या निषेर्धात कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनतर्फे इचलकरंजी येथील शिवाजी पुतळा येथे एकत्र जमून मोर्चाने मलाबादे चौकात आज आमदार सुरेश हाळवणकर व वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली.
First published on: 21-11-2012 at 05:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bills thrown in fire in ichalkarangi for electric high bill charge