परभणीतून शुभेच्छा संदेश
कें द्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात १२ लाख १२ हजार शुभेच्छा संदेश संकलित करण्याचा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमांतर्गत जिल्ह्य़ात संकलित करण्यात आलेले शुभेच्छा संदेश विजय भांबळे यांच्या हस्ते पक्षाक डे सुपूर्द करण्यात आले.
संदेशाच्या पाश्र्वमूमीवर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची शुभेच्छा संकलन यात्रा सुरू आहे. यात्रेचे नियोजनप्रमुख सुधीर शिंदे बुधवारी येथे आले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भांबळे यांनी शिंदे यांच्याकडे शुभेच्छा संदेश सुपूर्द केले. महापौर प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, यात्रेचे संयोजक बाबासाहेब पाटील, सुधीर शिंदे, योगेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती. वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवनात हा कार्यक्रम पार पडला. भांबळे, सुधीर शिंदे, योगेंद्र गायकवाड, महापौर प्रताप देशमुख आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन रमाकांत कुलकर्णी यांनी केले.