कल्याणमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव मंगळवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला. कल्याणमधील काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेना नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली.
नगरसेवक मोहन उगले, प्रकाश पेणकर, दिपेश म्हात्रे व अन्य नगरसेवकांनी ही मागणी उचलून धरली. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुखांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सर्वांनाच आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. अन्य विकासकामांबरोबर कल्याण डोंबिवलीतील काळा तलावाचे सुशोभिकरण, आनंद बालभवनची उभारणी ही शिवसेनाप्रमुखांची स्वप्ने होती. बाळासाहेबांच्या रेट्यामुळेच ती वेळेत पूर्ण झाली असे अनेकांनी यावेळी भावना विवश होऊन सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक
कल्याणमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव मंगळवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला. कल्याणमधील काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेना नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली.
First published on: 21-11-2012 at 09:45 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black lake shivsena pramukh memorial