लातूर जिल्हा परिषदेच्या ८ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. उदगीर येथील छत्रपती शाहूमहाराज सैनिक विद्यालयात ही सभा झाली. जि. प. सभागृहाचे बांधकाम सुरू असल्यामुळे ही सभा सैनिकी शाळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, सर्व विषय समित्यांचे सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष निलंगेकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. जि. प.च्या उत्पन्नात वाढ करण्याचा विषय पुढे आला. ज्या ज्या ठिकाणी जि. प. मालकीच्या जागा आहेत, त्या ठिकाणी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल गाळे उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला. याची सुरुवात उदगीरपासून करण्यात येणार आहे. अनामत म्हणून ५ लाख रुपये देण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2013 रोजी प्रकाशित
लातूर जिल्हा परिषदेचा आठ कोटींचा अर्थसंकल्प
लातूर जिल्हा परिषदेच्या ८ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. उदगीर येथील छत्रपती शाहूमहाराज सैनिक विद्यालयात ही सभा झाली. जि. प. सभागृहाचे बांधकाम सुरू असल्यामुळे ही सभा सैनिकी शाळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
First published on: 27-03-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget of 8 cr of latur zilla parishad approved