जिल्ह्यातील मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्ह्यात ८ लाख ६ हजार ८९२ मतदारसंख्या आहे. यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी केले.
िहगोली लोकसभा मतदारसंघात िहगोलीसह ३ विधानसभा मतदारसंघ असून, या ३ मतदारसंघांत ८ लाख ६ हजार ८९२ मतदार आहेत. यात ओळखपत्र असलेले मतदार ७ लाख ९१ हजार २०५, तर मतदारयादीत छायाचित्र असलेले ७ लाख ८७ हजार ४६८ मतदार आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया सतत चालू राहणार आहे. मतदारयादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री करून घ्यावी. नावात काही चूक असल्यास त्यात दुरुस्ती करण्यास वेळ आहे. त्यामुळे मतदारांनी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीचे अवलोकन करावे, असे आवाहन पोयाम यांनी केले.
वसमत मतदारसंघात २ लाख ५६ हजार ४७६, कळमनुरी २ लाख ७३ हजार ४८२, तर िहगोली मतदारसंघात २ लाख ७६ हजार ९३४ असे एकूण ८ लाख ६ हजार ८९२ मतदार आहेत. यात पुरुष मतदारसंख्या ४ लाख २९ हजार २५७, तर महिला मतदारसंख्या ३ लाख ७७ हजार ६३४ आहे. नव्याने नोंद केलेल्या १८ ते १९ वर्षे वयोगटातील मतदारसंख्या १४ हजार २३४ आहे. यात वसमत ४ हजार ३७८, कळमनुरी ५ हजार, तर िहगोलीत ४ हजार ७०५ याप्रमाणे मतदार आहेत. ४ हजार ५५० मतदारांच्या नावात दुरुस्ती करण्यात आल्याचे पोयाम यांनी सांगितले.