गोठिवली सेक्टर २७, स्मशानभूमीच्या मागे असणाऱ्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर इमारत बांधण्याचे काम सुरू होते. या भूखंडावर सिडकोने शुक्रवारी कारवाई केली. या वेळी सिडकोने एका इमारतीवर व बाजूला असणाऱ्या बेकरीवर कारवाई केली.
स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदस्त असणाऱ्या भाडोत्री गुंडाच्या मदतीने मोकळ्या जागेवर कुठलीही परवानगी न घेता ही बेकायदा इमारत उभी करण्यात येत होती. या कारवाईच्या वेळी २ पोकलेन, ४ आधिकारी, ३० कामगार, ५० पोलीस असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाई सकाळी ११ वाजल्यापासून सुरू कराण्यात आली होती.
या वेळी सिडकोचे साहाय्यक निरीक्षक आधिकारी दिलिप गनावरे यांनी सांगितले की, सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत होते. या ठिकाणाच्या असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर फलक लावण्यासाठी तसेच कुंपण घालण्यासाठी अभियांत्रिकी विभागाला कळवणार आहे.