येथील नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छाया गोरे व काँग्रेसकडून मीना शेंडगे यांच्यात सरळ लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अन्य इच्छुकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.
नगराध्यपदाची निवडणूक दि. १ फेब्रुवारीला (शनिवार) होणार आहे. हे पद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काठावरचे बहुमत म्हणजे १० जागा, काँग्रेसला ८ जागा व एका जागेवर काँग्रेसपुरस्कृत अपक्ष निवडून आला आहे. या संख्याबळानुसार नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने चमत्काराची भाषा सुरू केली असून, त्याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
श्रीगोंदे नगराध्यपदासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये लढत
येथील नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छाया गोरे व काँग्रेसकडून मीना शेंडगे यांच्यात सरळ लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अन्य इच्छुकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.
First published on: 31-01-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contest between ncp congress for the post of srigonde mayor