पालिकेच्या भायखळा विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागामधील सफाई मुकादमास सोमवारी सकाळी कामाठीपुरा येथे शुल्लक कारणावरून गुंडांनी बेदम मारहाण केली. त्यात हा मुकादम गंभीर जखमी झाला असून त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन गुंडांना अटक करण्यात आले आहे.
सफाई मुकादम अरविंद गोवळकर नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६ वाजता कामावर आले. कामगारांना कामाची वाटणी करून दिल्यानंतर ते कामाठीपुरा येथील बाप्टी रोडवरील सिद्धार्थ नगरमध्ये कचरा उचलण्यासाठी गेले. कचरा उचलणारी गाडी उभी करण्यासाठी जागा नसल्याने तेथे उभ्या असलेल्या टुरीस्टच्या गाडय़ा हलविण्यास त्यांनी क्लिनरला विनंती केली. यावरुन उभयतांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. या परिसरातील सहा गुंडांनी गोवळकर यांना जोरदार मारहाण केली. त्यात गोवळकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. घटनास्थळी धावून आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गोवळकर यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य तिघे फरारी आहेत. याप्रकरणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस गोविंद कामतेकर, अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2014 रोजी प्रकाशित
पालिकेच्या मुकादमास मारहाण; तीन गुंडांना अटक, तिघे फरारी
पालिकेच्या भायखळा विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागामधील सफाई मुकादमास सोमवारी सकाळी कामाठीपुरा येथे शुल्लक कारणावरून गुंडांनी बेदम मारहाण केली. त्यात
First published on: 11-06-2014 at 08:13 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation mukadam beaten hooligans three arrested