विजेचे शॉर्टसर्कीट होऊन त्यातून एका झोपडीला लागलेल्या आगीत पती-पत्नी दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि. २८) रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली.
तोंडले ते तांदुळवाडी रस्त्यावर पताळेवस्ती असून एकांत वस्तीमुळे ही दुर्घटना उशिरा समजली. याठिकाणी छप्पराच्या घरात झोपलेल्या बाबासाहेब लक्ष्मण पताळे (वय ४५) व त्यांची पत्नी मिनाक्षी बाबासाहेब पताळे (वय ३५) यांना काय होतेय हे कळायच्या आतच आगीने भक्ष्य केले.
वेळापूर पोलीस ठाण्यात याची अकस्मात मयत अशी नोंद असून सहा. पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर पुढील तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
झोपडीला लागलेल्या आगीत माळशिरसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू
विजेचे शॉर्टसर्कीट होऊन त्यातून एका झोपडीला लागलेल्या आगीत पती-पत्नी दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि. २८) रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली.
First published on: 29-11-2012 at 08:23 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple died in fire in solapur district