गेल्या काही वर्षांत क्रिकेटसह अनेक पाश्चिमात्य खेळाचे महत्त्व वाढत आहे. नवीन पिढी त्याकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित होत आहे. ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ असे  इतिहासाच्या पुस्तकात लिहिले असले तरी प्रत्यक्ष मात्र ‘जीवा’ तयार करण्यासाठी आज प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिवकालीन खेळांचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून कमी होत चालले की काय? असे वाटत असतानाच शिवकालीन खेळांची परंपरा टिकून ठेवण्याचे काम शहरातील चिमासाहेब भोसले व्यायाम शाळा करीत आहे.
गेल्या काही वर्षांंपासून क्रिकेटची क्रेझ मोठय़ा प्रमाणात वाढली असल्यामुळे उन्हाळाच्या सुटय़ा लागल्या की साधरणत: शहरातील मैदाने क्रिकेटमय होत आहेत. ज्या खेळांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे त्या शिवकालीन खेळाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सक्करदरा तलावाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात चिमासाहेब भोसले व्यायाम शाळेतर्फे प्रभाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी भोसले आणि त्यांची प्रशिक्षित असलेली चमू लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना शिवकलीन खेळांचे प्रशिक्षण देत आहे. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यावेळी योद्धे तयार केले जात असत. त्यावेळी तलवारबाजी, लाठीकाठी, बॅनेट, दाणपट्टा, बाणा, जंबिया आदी शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते आणि आजही ती परंपरा जोपासण्याचे काम प्रभाकरराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून सर्व खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. १७० च्या जवळपास मुले आणि मुली या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. त्यात ४० युवतींचा समावेश आहे. अनेक चाळीशी पार केलेल्या महिलांचा यात समावेश आहे.
संभाजी भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, सुरुवातीच्या काळात आखाडे असल्यामुळे या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण दिले जात होते. छोटा ताजबाग परिसरात भोसलेंचा वाडा होता. त्यावेळी इंग्रज राजवटीच्या विरोधात यौद्धे आणि पहेलवान तयार केले जात होते. प्रारंभी १९८० मध्ये ताज राज हिरा आखाडा मंडळ या नावाने शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, चिमासाहेब भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने व्यायाम शाळा सुरू केली आणि त्या माध्यमातून शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत पाच ते सहाशे युवक आणि युवतींना प्रशिक्षण देण्यात आले असून अनेक पालक पाल्यांना शिवकालीन खेळांचे शिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत.
 िझगाबाई टाकळी आणि वाठोडा भागात या खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केल्यानंतर शिवकालीन खेळ शिकविण्यासाठी शिबीर आयोजित केले जाते. सकाळी ५.३० ते ८ आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत साधारण प्रशिक्षण देत असतो. मुलांची शारीरिक क्षमता सक्षम करण्यासाठी त्यांना प्रारंभी सूर्यनमस्कार, धावणे, दोराच्या सहाय्याने झाडावर चढणे आदी प्रशिक्षण दिले जाते. मुलांच्या हाती शस्त्रे देताना त्या शस्त्राची माहिती आणि त्याचा उपयोग कसा केला पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते.
राज्य शासनाचा स्वयंसिद्धा ही योजना असताना आम्हीसुद्धा युवतींना त्याच पद्धतीने आत्मसंरक्षणासाठी प्रशिक्षण देत असतो. शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. खेळांमध्ये समय सूचकता ही अतिशय महत्त्वाची असून त्याचे शिक्षणसुद्धा दिले जाते. प्रसाद काळे, भरत खडसे, महेश देवगडे, हितेश डफ, राहुल रणखांब, निशिकांत डांगरे हे युवा प्रशिक्षक या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत. साधारणत: या शिवकालीन खेळांमध्ये पारंगत होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, त्यासाठी मेहनत, शारीरिक आणि मानसिक क्षमता असली पाहिजे,  असेही संभाजी भोसले म्हणाले.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !