व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा टय़ूब या संकेतस्थळावरील व्हिडिओ अनधिकृतरीत्या बंद केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी येथील मुकेश क्षीरसागर यास अटक केली.
आनंद गुरुचरण डिंग्रा (वय ३९, रा. पुष्पवाटिका, इंदोर) यांनी दि. १८ सप्टेंबर २०१३ ला मध्य प्रदेशमधील इंदोर येथील सायबर क्राइम व उच्च तांत्रिक विभागात याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार डिंग्रा यांचा गर्भसंस्काराची ऑनलाइन माहिती देण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी याबाबतचे व्हिडिओ यू टय़ूब या संकेतस्थळावर अपलोड केलेले आहेत. दि. ३ सप्टेंबर २०१३ रोजी व्हिडिओ संकेतस्थळावरून ते डिलीट करण्यात आले. याबाबत त्यांनी सायबर क्राइम विभागात तक्रार नोंदविली. सायबर क्राइमच्या अधिका-यांनी कॉपी राईटबाबतची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर यू टय़ूब व्यवस्थापनास तसे कळविले. त्यानंतर हे व्हिडिओ पुन्हा सुरू करण्यात आले.
तपासात यू टय़ूब व गुगलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील व्हिडिओ बंद करण्यासाठी वापरण्यात आलेला इ-मेल हा श्रीरामपूर येथील आयपी अॅड्रेस जयश्री क्षीरसागर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरी चौकशी केली असता संबंधित आयपी असलेला संगणक मुकेश क्षीरसागर वापरत असल्याचे पुढे आले. त्याचा व्यवसायही तक्रार करणा-या डिंग्रा यांच्यासारखाच असल्याचे समजले. त्यानुसार आज पोलीस निरीक्षक सुनीता कटारा, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चंदेल व कर्मचारी दिग्विजयसिंग चौहान यांनी मुकेश याच्या श्रीरामपूर येथील घरी जाऊन त्यास अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
श्रीरामपूर येथील सायबर व्यावसायिकास अटक
व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा टय़ूब या संकेतस्थळावरील व्हिडिओ अनधिकृतरीत्या बंद केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी येथील मुकेश क्षीरसागर यास अटक केली.

First published on: 07-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber professional arrested in shrirampur