भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर केली. जिल्हा संघटकपदी डॉ. स्वाधीन गाडेकर (उत्तर) व आबासाहेब गुंड (दक्षिण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीत दोन संघटक, चार सरचिटणीस, अकरा उपाध्यक्ष व दहा चिटणिसांचा समावेश आहे. मोरे यांची चार महिन्यांपूर्वी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर आता त्यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. सरचिटणीस- उदय अनभुले (नगर), अप्पा इरकर (कर्जत), हनुमंत भुतकर (नगर), असीफ पठाण (संगमनेर). उपाध्यक्ष- नितीन लोंढे (कर्जत). किशोर गुंदेचा (राहुरी), सचिन ढोबळे (श्रीरामपूर), महादेव दहिफळे (पाथर्डी), मंजाबापू बेरड (नगर), प्रशांत शिंदे (जामखेड), गणेश कराड (शेवगाव), अंकुश बडांगे (राहाता), राजेंद्र भोस (श्रीगोंदे), संजय लवांडे (नेवासे), गुड्डू जरेकर (पारनेर). चिटणीस- वाल्मीक देशमुख (अकोले), नितीन हुलगुंडे (जामखेड), बाळासाहेब गरुड (नेवासे), हिरामण वायकर (संगमनेर), पंडित शिंदे (कोपरगाव), ज्ञानदेव लष्कर (कर्जत), नितीन फुंदे (शेवगाव), राजेंद्र विधाते (श्रीगोंदे), ज्ञानेश्वर पेचे (नेवासे), विशाल त्रिवेदी (श्रीरामपूर). कोषाध्यक्ष- दत्ता गिते (जामखेड). जिल्हा कार्यालय चिटणीस- अनिल गदादे (कर्जत). याशिवाय १७ सदस्यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
भाजयुमोची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर केली. जिल्हा संघटकपदी डॉ. स्वाधीन गाडेकर (उत्तर) व आबासाहेब गुंड (दक्षिण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
First published on: 06-02-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District executive announced of bharatiya janata yuva morcha