‘डाऊन्स सिंड्रोम’ असलेली देवांशी जोशी ही राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. देवांशी जोशी ही १९ वर्षांची असून तिला ‘डाऊन्स सिंड्रोम’ आहे. डाऊन्स सिंड्रोम असलेली मुले त्यांच्या चिनी-जपानी चेहरेपट्टीमुळे, तसेच हसऱ्या व शांत स्वभावामुळे ओळखली जातात. देवांशीने दहावीची परीक्षा राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून दोन वर्षांपूर्वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. ज्या शालेय विद्यार्थ्यांना मानसिक, सामाजिक अथवा आर्थिक दौर्बल्यामुळे शाळेत शिकणे कठीण जाते, अशा सर्व मुलांना स्व-गतीने शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र सरकार मुक्त विद्यालयाचा उपक्रम राबवते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण करणे हा पुढील आयुष्यात व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने या मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे समाजाचा या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. सामान्य मुलांमध्ये सहजपणे मिसळता याव या उद्देशाने देवांशीने आठवीपर्यंतचे शिक्षण हिंदू ज्ञानपीठमधून पूर्ण केले. तिचे वडील अनिल जोशी हे नवी दिल्ली येथील आयबीएम इंडिया संशोधन प्रयोगशाळेत काम करतात, तर गृहिणी असलेल्या आई रश्मी हिने देवांशीच्या यशासाठी परिक्षम घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘डाऊन्स सिंड्रोम’ ग्रस्त देवांशी बारावी उत्तीर्ण
‘डाऊन्स सिंड्रोम’ असलेली देवांशी जोशी ही राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. देवांशी जोशी ही १९ वर्षांची असून तिला ‘डाऊन्स सिंड्रोम’ आहे. डाऊन्स सिंड्रोम असलेली मुले त्यांच्या चिनी-जपानी चेहरेपट्टीमुळे, तसेच हसऱ्या व शांत स्वभावामुळे ओळखली जातात.
First published on: 25-12-2012 at 02:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Down sindrom effected devanshi had pass th hsc exam