राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे यांची नवी दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांची नेमणूक पाच वर्षांसाठी राहील. डॉ. काळे काव्यसमीक्षक असून त्यांचे त्यांचे ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’, ‘मर्ढेकरांची कविता : आकलन, आस्वाद आणि चिकित्सा’ इत्यादी प्रमुख ग्रंथांसहित एकूण आठ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. उत्तम समीक्षा लेखनासाठी दिला जाणारा शासनाचा नरहर कुरंदकर पुरस्कार व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.