बँकॉक व सिंगापूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. नंदकुमार राठी व डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी आपला शोधनिबंध सादर केला.
बँकॉक परिषदेत डॉ. राठी यांनी ‘इपॉरिंग वुमन अ‍ॅज द एजंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक चेंज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट थ्रू असेसमेट ऑफ ट्रेनिंग इन डेअरी फार्मिंग’, तर सिंगापूर परिषदेत ‘युज ऑफ कम्युनिकेशन मीडिया बाय रुरल गोटकीपर्स अ‍ॅण्ड इटस कोरिलेशन विथ सोशियो इकॉनामिक कॅरेक्टरीस्टीक्स’ या निबंधांचे वाचन झाले. यापूर्वी डॉ. राठी यांना मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग रीसर्च पेपरसाठी गौरविण्यात आले. डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी बँकॉक परिषदेत ‘फायनॅन्शियल अ‍ॅनॅलिसीस ऑफ प्लास्टिक इंडस्ट्रीज’ तसेच सिंगापूर परिषदेसाठी ‘एक्सचेंज ट्रेडेट फंडमध्ये भारतातील वातावरण’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.