सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरजवळ इटकळ येथे थांबलेल्या मालमोटारीवर दुसरी मालमोटार आदळून घडलेल्या अपघातात आदळलेल्या मालमोटारीच्या चालकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.
मशाक बंदगी बडनेर (वय ३५, रा. तुंबडी, ता. जेवरगी, जि.गुलबर्गा) असे मृत मालमोटारचालकाचे नाव आहे. जखमींमध्ये तस्लिम सलीम मुल्ला (वय ३०, रा. डांळिंब, ता. उमरगा), सुनीता भगवान इगवे (वय ३५) व तिचा पती भगवान दादाराव इगवे (वय ४५, रा. तुगाव, ता. उमरगा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हे सर्व जण एका मालमोटारीतून डािळब येथून सोलापरकडे येत होते. परंतु वाटेत इटकळ येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर सदर मालमोटार आदळल्याने हा अपघात झाला.
मालट्रक झोपडीत घुसल्याने बालिकेचा मृत्यू
शहरानजीक मुळेगाव तांडय़ाजवळ एका झोपडीत मालमोटार घुसल्याने घडलेल्या अपघातात झोपडीतील चिमुकल्या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिची लहानगी बहीण जखमी झाली. चाहत शब्बीर शेख (वय ४) असे दुर्दैवी मृत बालिकेचे नाव आहे. तर या अपघातात तिची बहीण सुरैय्या (वय ७) ही जखमी झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित
मालमोटारीच्या अपघातात चालकाचा मृत्यू; तिघे जखमी
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरजवळ इटकळ येथे थांबलेल्या मालमोटारीवर दुसरी मालमोटार आदळून घडलेल्या अपघातात आदळलेल्या मालमोटारीच्या चालकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.
First published on: 18-05-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver killed 3 injured in motor accident