कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना बैलगाडीची सुंदर प्रतिकृती भेट दिली. बाजार समितीचे सभापती दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील, संचालक दीपक आकाराम पाटील आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. या प्रसंगी कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आलेली बैलगाडीची सुंदर प्रतिकृती ऊरळीकांचन (जिल्हा पुणे) येथील शिल्पकार गणेश कुंभार यांनी साकारली आहे.