मालिकांमध्ये कथानक अचानक पुढे सरकण्याचा प्रकार प्रेक्षकांना आता नवीन राहिलेला नाही. एखाद्या मालिकेच्या कथानकात फार काही घडत नसले, तर अशा काहीतरी क्लृप्त्या लढवून कथानक पुढे ढकलले जाते. ईटीव्ही मराठीवरील ‘एक मोहोर अबोल’ या मालिकेतील कथानकही असेच पुढे सरकरणार आहे. त्यात मालिकेची नायिका नंदिनी मृत्युमुखी पडणार आहे. मात्र सात वर्षांनी पुढे सरकलेल्या या कथानकात नंदिनीसारखेच दिसणारे एक नवीन पात्र येणार आहे. मात्र ही नवीन नंदिनी आधीच्या नंदिनीपेक्षा खूपच वेगळी असल्याने तिचा ‘लूक’ही बदलणार आहे.
‘एक मोहोर अबोल’ या मालिकेत नंदिनीची भूमिका खुशबू तावडे साकारत असून भैरवच्या भूमिकेत सुनील बर्वे आहे. सध्याची नंदिनी अत्यंत सोज्ज्वळ, सात्त्विक आहे. मात्र या नंदिनीचा मृत्यू होणार आहे. भैरवला वाचवताना नंदिनी मृत्युमुखी पडल्यानंतर मालिका सात वर्षे पुढे सरकणार आहे. सात वर्षांनंतर आधी नंदिनीच्या भूमिकेत असलेली खुशबू तावडे नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या लूकमधील आणि नवी भूमिका साकारणारी खुशबू आजकालच्या मुलींसारखी बिनधास्त, हसती खेळती असेल. भैरवची भूमिका साकारणाऱ्या सुनील बर्वे याचाही लूक बऱ्यापैकी वेगळा दिसेल.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘एक मोहोर अबोल’च्या कथानकाची उडी सात वर्षे पुढे
मालिकांमध्ये कथानक अचानक पुढे सरकण्याचा प्रकार प्रेक्षकांना आता नवीन राहिलेला नाही. एखाद्या मालिकेच्या कथानकात फार काही घडत नसले, तर अशा काहीतरी क्लृप्त्या लढवून कथानक पुढे ढकलले जाते.
First published on: 08-06-2013 at 12:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek mohor abol story jumped seven years ahed