नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्क मध्ये २०, २१ व २२ फेब्रुुवारी रोजी झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागून उत्साह वाढावा या दृष्टीने विविध स्पर्धाचे व उद्यान स्पध्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.  
या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांची विविधता एकाच छताखाली पाहावयास मिळणार असून यामध्ये शैक्षणिक विद्यालये व महाविद्यालय, एमआयडीसी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच सोसायटय़ांनी उद्यान स्पध्रेमध्ये सहभाग घेतला आहे.  
यामध्ये फुलांची रांगोळी, भाज्या, फळे, फुले यांची कलात्मक रचना, शोभिवंत झाडे, वटवृक्ष यांचे वैशिष्टय़पूर्ण दर्शन घडणार आहे.  हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. या प्रदर्शनाला मोठय़ा संख्येने नागरिकांनी भेट देऊन निसर्गातील विविधतेचा अनुभव घ्यावा. तसेच मनातील पर्यावरणविषयीची गोडी वाढवावी असे आवाहन वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले केले. यामध्ये सहभागाबाबतच्या अधिक माहितीसाठी ९७६९६९६२७६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधवा.