महापालिकेने अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील राज्य सरकारने नागपुरातील पटवर्धन मैदानाची लीज नूतनीकरण न केल्याने दोन दशकांहून अधिक काळापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक होऊ शकलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून महापालिकेने १९९२ मध्ये यशवंत स्टेडियम लगतच्या पटवर्धन मैदानावर स्मारक उभारण्याचा ठराव केला होता. त्यानंतर २००२ मध्ये तत्कालीन महापौर विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने जन्मशताब्दी स्मारक उभारण्याकरिता २५ कोटींची तरतूद करण्यात आली. परंतु ज्या जागेवर स्मारक उभारले जाणार आहे. त्या  जागेच्या लीजची मुदत सन १९७७ मध्येच संपली आहे. या जागेच्या भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे वारंवार विनंती केली. परंतु राज्य सरकारने लीज नूतनीकरण केले नाही. त्यामुळे स्मारकाचे गेल्या २२ वर्षांपासून रखडले आहे. पटवर्धन मैदानाची एकूण १३.५६ एकर जागा ही बहुउद्देशीय स्टेडियमच्या उपयोगाकरिता दिलेली आहे. सदर भूखंड राज्य शासनाच्या मालकीचा असून शासनाने महापालिकेला नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास शताब्दी भवन निर्मितीचा मार्ग मोकळा होईल.

उच्च विद्याविभूषित, नम्र स्वभावाचा आणि सुसंस्कृत असा देवेंद्रच्या रूपाने राज्याला मुख्यमंत्री मिळाला आहे. ज्या विचारधारेचे देवेंद्र प्रतिनिधीत्व करतो आहे त्यातून त्याने बाहेर पडून समाजातील वंचित, गोरगरीब आणि दलितांसाठी काम केले पाहिजे. समाजात जातीय संघर्ष मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. विशेषत दलितावरील अन्यायाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
डॉ. रूपा कुळकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां