तालुक्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची भरती प्रक्रियेचे आयोजन होऊन महिना होत आला तरी निवड झालेल्या महिलांना शासन चौकशीच्या नावाखाली नियुक्तीपत्र देण्यास विलंब करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच निवड झालेल्या महिलांना विनाविलंब नियुक्तीपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी या सर्व अन्यायग्रस्तांनी २० मेपासून नाशिक येथे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे इगतपुरीतील अंगणवाडी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने दोन मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.
ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्यांना निवडीचे पत्र देण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला गेल्याने भरतीत निवड झालेल्या शेकडो महिलांचे भवितव्य अंधारात आले आहे. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी तीन महिने उलटूनही चौकशी पूर्ण होत नसल्याने निवड झालेल्या महिला संतप्त झाल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2013 रोजी प्रकाशित
अंगणवाडी सेविकांचा उपोषणाचा इशारा
तालुक्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची भरती प्रक्रियेचे आयोजन होऊन महिना होत आला तरी निवड झालेल्या महिलांना शासन चौकशीच्या नावाखाली नियुक्तीपत्र देण्यास विलंब करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच निवड झालेल्या महिलांना विनाविलंब नियुक्तीपत्र देण्यात यावे.
First published on: 17-05-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fasting agitation warning by anganwadi servent