सिध्देश्वर यात्रेसाठी शिंदे सोलापुरात

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या सोलापूर भेटीवर येत आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी शिंदे हे कुटुंबीयांसह सोलापुरात दाखल होत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या सोलापूर भेटीवर येत आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी शिंदे हे कुटुंबीयांसह सोलापुरात दाखल होत आहेत. उद्या शनिवारी सकाळी शिंदे यांचे रेल्वेने आगमन होणार असून त्यानंतर लगेचच सकाळी आठ वाजता उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठापासून सिध्देश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी निघणाऱ्या नंदिध्वजांचे पूजन शिंदे कुटुंबीय करणार आहेत. नंतर नंदिध्वजांच्या मिरवणुकीचा शुभारंभ शिंदे हे करतील. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सिध्देश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यास शिंदे हे हजेरी लावणार आहेत.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For siddheshwar pilgrimage sushilkumar shinde in solapur visit

Next Story
रद्दीतील ‘टपाला’चा घोटाळा..
ताज्या बातम्या