अकोट येथे गणेशोत्सवादरम्यात व्यावसायिक तेजस सेदाणी या तरुणाची भीषण हत्या करण्यात आली. त्या प्रकरणातील चारही आरोपींना आज दुपारी यवतमाळ येथून त्यांच्या नातेवाईकाकडून अटक करण्यात आली, असे एक वृत्त आहे. अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मी नांदेडकर व ठाणेदास कैलास नागरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
या हत्या प्रकरणातील आरोपी तुषार पुंडकर, ऋषिके श रवींद्र चौधरी, अतूल सदाशिव गावंडे व अरविंद विनायक घायसुंदर या चौघांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या एका माहितीनुसार हे चौघेही पोलिसांना शरण गेल्याचे सांगण्यात आले.
११ सप्टेंबरला रात्री तुषार पुंडकर व त्याच्या जवळपास ८ ते १० साथीदारांनी सेदाणीवर प्राणघातक हल्ला केला होता. यात सेदाणी जबर जखमी झाल्यावर त्यास अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण पहाटे २ वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यावर हे प्रकरण हत्या म्हणून नोंदविण्यात आले होते.
तेव्हापासून हे आरोपी फरार होते. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी आपल्या सर्व युक्तया वापरल्या व शेवटी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.