दुभंगलेले ओठ व टाळू या व्यंगाच्या नांदेड जिल्ह्य़ातील मुलांवर लहाने रुग्णालयात मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिर दि. २१पासून सुरू झाले. उद्या (गुरुवारी) शिबिराचा शेवटचा दिवस आहे. शिबिरात ४० ते ५० मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहेत.
लहाने रुग्णालय व स्माइल ट्रेन यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. डॉ. विठ्ठल लहाने व त्यांचे सहकारी गेल्या आठ वर्षांपासून तो राबवत आहेत. या उपक्रमातून आतापर्यंत ५ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शिबिराशिवाय असा व्यंगाचा रुग्ण कधीही लहाने रुग्णालयात आल्यास त्याच्यावर पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती डॉ. विठ्ठल लहाने यांनी दिली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. लहाने, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शहा, डॉ. कल्पना लहाने, डॉ. किरण तोडकरी, डॉ. दुष्यंत बुरबुरे, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. संदीपान साबदे, डॉ. राम कुलकर्णी व लहाने रुग्णालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.