दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून रागापोटी मित्राचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे मिरजेच्या संजयनगर झोडपपट्टीत घडला.
परशुराम रोहिदास कट्टीमनी (वय २१) हा दुर्गामाता विसर्जन मिरवणूक पाहून घरी परतत असताना नवजीवन कॉलनीत दबा धरुन बसलेल्या जितेंद्र ऊर्फ प्रदीप दिलीप तायडे (वय २१) याने डोक्यात व गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. ही घटना रात्री १ वाजता घडली.
घटना समजताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करुन आरोपी जितेंद्र तायडे याला हत्यारासह पहाटे ५ वाजता ईदगाह माळ येथे अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
दारूस पैसे न दिल्याने मित्राचा खून
दारूपिण्यास पसे दिले नाहीत म्हणून रागापोटी मित्राचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे मिरजेच्या संजयनगर झोडपपट्टीत घडला.

First published on: 01-10-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends murder to not giving money for virgin