गूळ मध्यम प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद पालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ नसलेला एक कोटी ८५ लाख १७ हजार रुपये शिलकी अंदाजपत्रकास नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सभेने मंजुरी दिली.
घरकुल योजना (२) मधील घरकुले उभारणीसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात ११ कोटी ८० लाख ५५ हजार रुपये जमा बाजूला असून ११ कोटी ७१ लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये अपंग कल्याणकारी योजनेसाठी आठ लाख, अल्पसंख्याक बहुक्षेत्र विकासासाठी १५ लाख, रस्त्यांसाठी एक कोटी ३५ लाख, सूजल निर्मल योजनेसाठी ४६ लाख व दुर्बल घटक कल्याणकारी योजनेसाठी नऊ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
चोपडा पालिका अंदाजपत्रकात पाणी योजनेसाठी निधी
गूळ मध्यम प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद पालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ नसलेला एक कोटी ८५ लाख १७ हजार रुपये शिलकी अंदाजपत्रकास नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सभेने मंजुरी दिली.
First published on: 08-03-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funds for water scheme in budget of chopada municipalty