पगार महापालिकेचा व चाकरी पुढाऱ्यांची असा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रकार थांबविण्यासाठी आयुक्त सुधीर शंभरकर यांनी धाडसी पाऊल उचलले आहे. यासाठी गुरुवारी (दि. २९) परभणी शहर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना कुठे व काय काम करतात, याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.
वर्षभरापूर्वी महानगरपालिका स्थापन झाली. तत्पूर्वी नगरपालिका होती. नगरपालिका असताना अनेक कर्मचारी नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या घरी कामाला होते. आजही ते त्याच ठिकाणी काम करतात. महसूल अधिकाऱ्यांच्या घरीही कामासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच पाचारण करण्यात येते. नगरपालिका असताना पालिकेचे अभियंता सरताजसिंग चाहेल यांनी चार कर्मचाऱ्यांना आपल्या घरी कामासाठी ठेवले होते. तेव्हा हा मुद्दा चर्चेला आला होता. महापालिका स्थापन झाल्यानंतरही अजूनही बरेच कर्मचारी पुढाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या घरी काम करतात. पगार महापालिकेचा व चाकरी पुढाऱ्यांची हा प्रकार थांबला पाहिजे, अशी भूमिका आयुक्त शंभरकर यांनी रुजू झाल्यानंतर घेतली. अशा कर्मचाऱ्यांच्या बाबत त्यांनी विभागप्रमुखंकडून माहिती मागवली. सर्व कर्मचारी महापालिकेच्या सेवेत परतले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर कामाचा ताण पडत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना शंभरकर यांनी महापालिका कार्यालयात पाचारण के ले आहे. यावेळी विभागप्रमुख कर्मचाऱ्यांबाबत माहिती देतील तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप सांगतील. यामुळे कुठला कर्मचारी कुठे काम करतो, ही बाब स्पष्ट होईल, असे महापालिकेचे मत आहे. थोडक्यात उद्या कर्मचाऱ्यांची ही ओळखपरेड आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
पगार महापालिकेचा, चाकरी पुढाऱ्यांची
पगार महापालिकेचा व चाकरी पुढाऱ्यांची असा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रकार थांबविण्यासाठी आयुक्त सुधीर शंभरकर यांनी धाडसी पाऊल उचलले आहे.
First published on: 29-11-2012 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get salary from corporation and do work for leaders