वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या, उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या ज्येष्ठांचा, विवाहाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. १०) करण्यात येणार आहे. दुष्काळात विशेष कार्य केलेले पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष यांनाही या वेळी गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्याचे आयोजन ‘राष्ट्रवादी’च्या १५व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्कार समारंभास पक्षनिरीक्षक मनोहर डाके, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, आमदार सतीश चव्हाण व संजय वाघचौरे, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा पार्वतीबाई शिरसाट आदी उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रवादी’तर्फे उद्या ज्येष्ठांचा स्नेहमेळावा
वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या, उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या ज्येष्ठांचा, विवाहाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. १०) करण्यात येणार आहे.
First published on: 09-06-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get together of seniors by rashtrawadi