मराठवाडय़ाच्या सर्व जिल्ह्य़ांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतक ऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.
राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर, प्रदेश काँग्रेसचे बसवराज पाटील नागराळकर, संतोष देशमुख व आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तातडीने टँकर सुरू करणे, विंधनविहिरी घेणे, जनावरांना चारा उपलब्ध करणे, दुभती जनावरे जगविण्यासाठी शेतक ऱ्यांना आर्थिक मदत करणे, मजुरांच्या हाताला काम देणे या बाबत माहिती देऊन मराठवाडय़ातील आठही जिल्हे दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
परीक्षा शुल्क व कृषी पंप वीजबिल माफ करावे, लातूर शहराला भंडारवाडी धरणातून पाणीपुरवठा व्हावा, एलबीटीच्या सुधारित प्रस्तावावर निर्णय घ्यावा, महापालिकेच्या आवश्यक सुविधांसाठी विशेष निधीची तरतूद करावी, मराठवाडय़ातील गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना मदत द्यावी या मागण्या करण्यात आल्या.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘मराठवाडय़ास तातडीने दुष्काळासाठी मदत द्यावी’
मराठवाडय़ाच्या सर्व जिल्ह्य़ांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतक ऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.
First published on: 12-02-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help for marathwada should be give in fast