येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या, मंगळवार ५ मार्च ते गुरुवार ७ मार्चपर्यंत इंजिनीअिरग, फार्मसी, मॅनेजमेंट, आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी पुलकॅम्पस जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
यात अ‍ॅनालिटीकल टेक्नॉलॉजी, बडोदा या कंपनीच्या ६०० जागांसाठी मुलाखती होणार असून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन, आयटी, फार्मसीच्या सर्व शाखांमधील शेवटच्या वर्षांला असलेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुलाखत होणार आहे. बुधवार ६ मार्च रोजी अ‍ॅनॉलिटिकल टेक्नॉलॉजी प्रा.लि. आणि कन्ट्री क्लब प्रा. लि. या कंपनीसाठी एम.बी.ए., बी.बी.ए., बी.फार्म., एम.फार्म., एम.एस.सी.(भौतिकशास्त्र आणि  रसायनशास्त्र) उत्तीर्ण झालेले  आणि  शेवटच्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होणार आहेत.
गुरुवार ७ मार्च रोजी जे.बी. डेकोर ही कंपनी एम.बी.ए.च्या उमेदवारांच्या, तसेच लॉगिप्रो सॉफ्टवेअर प्रा.लि. ही कंपनी इंजिनीअरिंगची पदवी असलेले व शेवटच्या वर्षांला असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
जॉब फेअर हे विद्यार्थी कल्याण विभाग संत गाडगेबाबा अमरवती विद्यापीठ, महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल बोर्ड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या जॉब फेअरचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.