जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात झालेल्या ५५ लाखांच्या अपहार प्रकरणी कनिष्ठ लेखा सहायक संजय शंकर गोसावी याला विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. यातील दुसरा आरोपी अधीक्षक प्रशांत हर्षद हा अद्याप सापडलेला नाही.
    समाजकल्याण विभागात शिष्यवृत्ती अनुदान, आंतरजातीय विवाह या मध्ये ५५ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याप्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी.मुंडे यांनी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
    शिष्यवृत्तीचे बोगस बिल तयार करून सुमारे २० लाख रुपये हडपले असून आंतरजातीय विवाहाची बोगस प्रकरणे करून ६ लाखांचा अपहार केला आहे.  स्टेट बँकेची बनावट चलने वापरून काही रक्कम हडपली आहे. अपहारातील २० लाख रुपये वसूल झाले आहेत. पोलिस हर्षदच्या शोधात आहेत.