बॉलिवूडची सर्वोत्तम ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ ला कोणता हिंदी चित्रपट आवडावा.. बरं आवडत असेलही. तिने तशाच चित्रपटात काम करायला आवडले असते असे सांगावे काय आणि तिच्या पदरात नेमका तोच चित्रपट येऊन पडतो काय.. कुठल्याही हिंदी चित्रपटात शोभावा असा योगायोग कतरिना कै फच्या बाबतीत घडला आहे. कतरिना कैफला ‘सीता और गीता’ हा हेमामालिनीचा चित्रपट खूप आवडतो. तसे तिने एका जाहीर कार्यक्रमात सांगितलेही होते. आणि आता खरोखरच या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा करण्यात आली असून कतरिनाची या भूमिकेसाठी निवड झाली आहे.
सत्तरच्या दशकात आलेला ‘सीता और गीता’ हा रमेश सिप्पी दिग्दर्शित चित्रपट चांगलाच गाजला होता. यात हेमामालिनीची दुहेरी भूमिका होती. याच चित्रपटाची कथा पुन्हा एकदा ‘चालबाज’ या नावाने रूपेरी पडद्यावर आली. ज्यात श्रीदेवीची मुख्य भू्मिका होती. आता कतरिनाच्या सुदैवाने तिसऱ्यांदा या चित्रपटाचा रिमेक होणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकची घोषणाही मूळ निर्माते अर्थात सिप्पींनीच केली आहे. सध्या सिप्पींची सूत्रे नव्या पिढीकडे अर्थात रोहन सिप्पीकडे आहेत. त्यामुळे रिमेकसाठी रोहनने कतरिनाला विचारणा केली आहे. रिमेकचे दिग्दर्शनही रमेश सिप्पीच करणार का?, अशी विचारणा रोहन सिप्पीला करण्यात आली. मात्र, रोहनने याचा इन्कार केला आहे. सिप्पींमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळी सीता और गीता या चित्रपटाचे हक्क रमेश सिप्पींकडे नसल्याची माहितीही रोहनने दिली आहे.
कतरिनाची या चित्रपटात निवड झाली आहे एवढेच नव्हे तर या चित्रपटातले दोन नायक कोण असावेत, यावरही तिचे मत घेण्यात येते आहे. त्यामुळे दोन नायकांमध्ये एकासाठी कॅट रणबीरची वर्णी लावणार, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, सध्या तरी कतरिना आणि निर्मात्यांच्या या चित्रपटासाठी बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे समजते. कतरिनाच्या आयुष्यात आलेला हा इच्छापूर्तीचा योगायोग मूळच्या सीता और गीताला म्हणजेच हेमामालिनीच्या किती पचनी पडतोय ते पहायचे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
‘सीता और गीता’साठी कतरिना?
बॉलिवूडची सर्वोत्तम ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ ला कोणता हिंदी चित्रपट आवडावा.. बरं आवडत असेलही. तिने तशाच चित्रपटात काम करायला आवडले असते असे सांगावे काय आणि तिच्या पदरात नेमका तोच चित्रपट येऊन पडतो काय..

First published on: 05-04-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaiff for sita aur gita