अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास प्रतिसाद देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक एन. के. दिंडे यांच्या पुढाकाराने हा संकल्प सोडण्यात आला. ज्ञानोबा भिकाणे व बबन गुळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पपत्रे भरून घेऊन प्रतिज्ञा म्हणवून घेतली. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
 धनंजय उजनकर यांनी सूत्रसंचालन केले.