भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मावेजाचे ६५ लाख रुपयांचे देयक सादर करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना भूसंपादन कार्यालयातील पेशकार भास्कर दामावले यास रंगेहाथ पकडण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. लाचखोर दामावले यास अटक करण्यात आली.
उमरगा येथील माशाळकर गल्लीत राहणाऱ्या जगदीश अशोक खसगे यांच्या आजोबांनी १९८८मध्ये भूसंपादन केलेल्या २२ एकर २४ गुंठे जमिनीच्या मोबदल्यापोटी पहिला हप्ता उचलला होता. त्यानंतर ही जमीन खसगे यांना बक्षीसपत्र म्हणून दिली. त्यापुढे अज्ञान पालनकर्ता म्हणून खसगे यांच्या आई लतिकाबाई खसगे यांचे नाव लावण्यात आले. तक्रारकर्ता जगदीश खसगे यांना जमिनीचा मावेजा वाढवून मिळावा, यासाठी उमरगा न्यायालयात दावा दाखल केला होता. उमरगा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच खसगे यांना मावेजा देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सरकारकडे अहवाल पाठवून भूसंपादन विभागाने जमिनीच्या मावेजापोटी ६५ लाख ७० हजार रुपये न्यायालयात जमा करावेत, असे आदेश भूसंपादन विभागास दिले होते. मावेजाच्या रकमेचे देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यास भूसंपादन अधिकारी कार्यालयातील पेशकार दामावले याने १० हजार रुपयांची मागणी खसगे यांच्याकडे केली होती. तडजोडीत ८ हजार रुपयांवर व्यवहार ठरला. सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील उपाहारगृहात या रकमेची लाच घेताना दामावले यास रंगेहाथ पकडले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2012 रोजी प्रकाशित
भूसंपादनाच्या पेशकारास अटक
भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मावेजाचे ६५ लाख रुपयांचे देयक सादर करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना भूसंपादन कार्यालयातील पेशकार भास्कर दामावले यास रंगेहाथ पकडण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. लाचखोर दामावले यास अटक करण्यात आली.
First published on: 14-11-2012 at 12:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land acquisition officer get arrested