शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. एका वस्तीवरील शाळेलाही कुलूप ठोकण्यात आले.
शिरुर तालुक्यातील नांदेवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिले आंदोलन झाले. या शाळेत मुलांच्या संख्येनुसार सात शिक्षकांची गरज असताना केवळ चारच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची परवड होत आहे. शाळेत आणखी शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. गावालगतच्या खंडोबा वस्तीवरील वस्तीशाळेत दोन शिक्षकांची आवश्यकता असताना एकच शिक्षक असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी या शाळेलाही कुलूप ठोकले.