‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’च्या ज्ञानार्पणचा शुभारंभ

आर्थिक विकासासोबतच कामगार, त्यांची कुटुंबे आणि स्थानिक लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी योगदान देणे ही कंपन्यांची सामाजिक जबाबदारी आहे, या तत्त्वाला अनुसरूनच ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’ने नागपूर जिल्ह्य़ातील मेटपांजरा येथे ‘ज्ञानार्पण’ उपक्रम सुरू केला आहे. ‘

खेडय़ातील मुलांच्या सर्वागीण विकासाचा प्रयत्न -देवस्थळी

आर्थिक विकासासोबतच कामगार, त्यांची कुटुंबे आणि स्थानिक लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी योगदान देणे ही कंपन्यांची सामाजिक जबाबदारी आहे, या तत्त्वाला अनुसरूनच ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’ने नागपूर जिल्ह्य़ातील मेटपांजरा येथे ‘ज्ञानार्पण’ उपक्रम सुरू केला आहे. ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’ आणि  देशभर विविध शैक्षणिक उपक्रम चालविणारी स्वयंसेवी संस्था ‘प्रथम’ यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक य. मो. देवस्थळी यांच्या हस्ते मेटपांजराच्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचे उद्घाटन झाले. मुंबईतील ‘प्रथम’ संस्थेच्या सह संस्थापक फरिदा लांबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
राज्यातील पाचशे खेडय़ांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शिक्षण आणि विज्ञान मित्र या दोन घटकांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. खेडय़ातील शिक्षणात मागे असलेल्या मुलांना शाळेतील शिक्षणाच्या व्यतिरिक्त शिक्षण देऊन त्याच्या सर्वागीण विकासाचा प्रयत्न केला जात आहे. अशा मुलांना पुस्तकी शब्दांऐवजी त्यांच्या मातृभाषेतून, अनुभवातून शिकविले जात आहे.
या उपक्रमांतर्गत गावक ऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी नाते जोडले जात आहे. प्राथमिक शिक्षण देणे हे सरकारचे काम असले तरी व्यापार क्षेत्रानेही यासाठी काही करावे, व्यवसायाद्वारे खेडय़ांशी जवळीक साधणे हा आमचा हेतू असून खेडय़ातील मुलांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू  केला आहे.
गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या  उपक्रमाचा  पुढे विस्तार केला जाणार आहे, असे य. मो. देवस्थळी म्हणाले. खेडय़ांमध्ये मूलभूत शिक्षणाचा विस्तार करणे हा ‘ज्ञानार्पण’चा मुख्य उद्देश आहे. खेडय़ातील मुलांमधील कौशल्य वाढावे, त्यांना सोप्या भाषेत शिक्षण मिळावे, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रथम ही संस्था राज्यातील १७ जिल्ह्य़ांमध्ये काम करीत आहे. भाषा आणि विज्ञान शिकविण्यासाठी ‘ज्ञानार्पण’ खेडय़ातील मुलांसाठी दर महिन्याला पाच दिवसांचे शिबीर आयोजित करणार आहे. शिक्षण स्वयंसेवक मुलांना विविध विषय शिकविणार
आहेत.  ६ ते १४ आणि १४ ते १८ अशा दोन वयोगटात हे काम केले जाणार आहे, असे फरिदा लांबे
म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांची पाहणी पाहुण्यांनी
करून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला मेटपांजराचे गावकरी उपस्थित  होते.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lt finance educate programe opening