बेलापूर येथील महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी विवेककुमार बिहारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन उपक्षेत्रीय प्रबंधक ए. के. केणगे यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
शाखाधिकारी बिहारी हे शाखेत बदलून आल्यानंतर ग्राहकांशी उद्धटपणे वागत होते, तसेच नवीन बँक खाती उघडत नसल्याने त्याला ग्राहक व गावकरी वैतागले होते. त्यामुळे त्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर गावकऱ्यांशी किणगे यांनी चर्चा केली.
बिहारी यांच्या वर्तनात सुधारणा करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर आंदोलन स्तगित करण्यात आले.
भारत स्वाभिमान समितीचे सदस्य विष्णूपंत डावरे यांनी राज्य सरकार संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँकेत पाठवते, पण बँकेचे अधिकारी त्यांना पूर्ण रक्कम त्वरित काढण्यास विरोध करतात व टप्प्याटप्प्याने अनुदान बँक खात्यातून काढायला भाग पाडतात. त्यामुळे गरीब, दलित आदिवासी, वृद्ध स्त्री-पुरूषांची कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यात सुधारणा करण्याचे आदेश किणगे यांनी दिले.