अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विभागनिहाय योजना योग्य नियोजन करून प्रभावीपणे राबवाव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाते. पुरवठा अधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, समिती सदस्य सय्यद मोईनोद्दीन अली अहेमद, ख्वाजा बानू, प्रभुदास गुप्ते, जिल्हा नियोजन विभागाचे लेखाधिकारी अजय खडके उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, समिती सदस्य सय्यद मोईनोद्दीन अली अहेमद यांची भाषणे झाली. गणेश सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात यांनी आभार मानले.